मिलिंग टँडममध्ये उसाचे गाळप केले जाते. कंपाऊंड इन्बिबिशन पद्धतीने मॅसरेशन जोडले जाते. उत्पादित बगॅसचा
वापर बॉयलरसाठी इंधन म्हणून केला जातो मिल्समधून मिळवलेला मिक्स ज्यूस मास फ्लो मीटरमध्ये वजन केला
जातो आणि नंतर ७०°C तापमानावर रॉ ज्यूस हीटरमध्ये गरम केला जातो. गरम केलेला ज्यूस ज्यूस सल्फिटेशन
टँकमध्ये पाठवला जातो, जिथे लाइम आणि SO₂ गॅस घालून अशुद्धता वेगळी केली जाते. त्यानंतर हा
ज्यूस १००°C ते १०५°C पर्यंत गरम करून ज्यूस हीटरमध्ये पाठवला जातो आणि क्लॅरिफायरमध्ये गाळायला पाठवला
जातो, जिथे मातीचे कण खाली बसतात.
गाळलेली माती फिल्टर करून अशुद्धता काढली जाते आणि मिळालेलं फिल्ट्रेट परत ज्यूस सल्फिटरमध्ये
उपचारासाठी टाकले जाते. स्वच्छ ज्यूस इव्हॅपरेटरमध्ये पाठवले जाते आणि तो ६० ब्रिक्स येईपर्यंत गरम केला
जातो, नंतर तो पॅन फ्लोअरवर क्रिस्टलाईझेशनसाठी पाठवला जातो जिथे A मॅसेक्युट उकळला जातो.
पॅनमध्ये तीन
मॅसेक्युट उकळण्याची योजना आहे, म्हणजे A मॅसेक्युट सेंट्रीफ्यूगल मशीनमध्ये नेला जातो, त्यातून पांढरी
साखर मिळवली जाते, जी साखर ग्रेडरच्या सहाय्याने ग्रेड केली जाते आणि बॅगमध्ये पॅक केली जाते. नंतर ती
साखर गोदामात साठवली जाते. बॉयलिंगनंतर सेंट्रीफ्यूगल मशीनमध्ये क्युरिंग झाल्यानंतर
शेवटी मोलासेस C मिळतं.