आपल्या कारखाना परिसरात सततच्या पर्जन्यमान बदलामुळे कारखान्यास पुरेसा ऊस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मागील हंगामात तुटलेल्या ऊसाचा खोडवा जास्तीत जास्त ठेवला जावा याकरीता पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, शुन्य मशागतीशिवाय खोडवा पिक संगोपन, द्रवरुप जीवणु खतांच्या फवारण्या, पिक संरक्षण,ऊस बेणे बदल व माती परिक्षणाचे महत्व इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणेसाठी शिवार फेरी व खोडवा व्यव्स्थापन कार्यशाळेचे दरवर्षी आयोजन केले जाते.
व्हि.एस.आय. पुणे उत्पादीत द्रवरूप व जिवाणु खते ऊस उत्पादकांना सहजतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व ऊसाची उत्पादकता वाढावी म्हणून कारखाना स्थळावर डेपो केलेला आहे. डेपो अंतर्गत खालीलप्रमाणे उत्पादने उपलब्ध आहेत.
अ.क्र | द्रवरुप खते | कि./लि. | दर (₹) | उपयोग |
---|---|---|---|---|
1 | मल्टिमायक्रोन्युट्रीयंट | ५ लि. | ८९३/- | सुक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा |
2 | मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट | ५ कि. | ८९३/- | मुख्य अन्नद्रव्य पुरवठा |
3 | ह्युमिक ॲसिड | १ लि. | २६३/- | पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी |
4 | प्लॉन्ट हेल्थ | १ लि. | २६३/- | नत्र स्थिर करणारे जिवाणु समुह |
5 | सॉईल हेल्थ | १ लि. | २६३/- | स्फुरद व पालाश विरघळ |
6 | वसंतउर्जा | १ लि. | २६३/- | जैवसंप्रेरक |
7 | डि. कल्चर | १ लि. | २६३/- | पाचट कुजविणारे जिवाणु |
8 | मायक्रोसोल | ५ कि. | ७३५/- | सुक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा |
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना शुध्द आणि निरोगी बियाणे सहजतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संशोधन केंद्रातुन मुलभूत व पायाभूत बियाणे आणुन कारखाना फार्मवरती १५ ते २० एकर वर ऊस बेणेमळा करुन ऊस उत्पादकांना बियाणे वाटप करतो. यावर्षी खालीलप्रमाणे ऊस जातीचा बेणेमळा आपल्याकडे उपलब्ध आहे.
अ.क्र | ऊसजात |
---|---|
1 | कोसी ६७१ |
2 | एमएस १०००१ |
3 | को ११०१५ |
4 | व्हीएसआय ८००५ |
5 | को-व्हीएसआय १८१२१ |
6 | फुले १५०१२ |
उस विकास विभाग अंतर्गत कारखाना स्थरावर गांडूळ खत प्रकल्प कार्यान्वित असून प्रती 50 किलो बॅग 500 रु प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेमार्फत दर वर्षी ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण आयोजित केले जाते.या प्रशिक्षणाकरिता जाणार्या शेतकर्याकरिता जाणे येणे प्रवास खर्च कारखान्यामार्फत दिला जातो.
कारखाना स्थळावर माती परोक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित असून यामध्ये आपण उस उत्पादक शेतकर्यांचे ना नफा ना तोटा या तत्वावर नमुना 120 रु प्रमाणे माती परीक्षण करून देतो.
Click the link below to view or download the PDF file: Open PDF